साहिल खान
तालुका प्रतिनिधी, लोणार
लोणार : तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंच्यातसाठी निवडणूक लागल्या होत्या. त्यामध्ये पहुर येथील सरपंच सह सर्व सदस्य हे अविरोध निवडून आले तर वेणी येथे एका वार्डातील एका जागेसाठी लढत होती तर वझर आझाव येथे सरपंच पदाचे नामांक अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहले आहेत. या मध्ये सुलतानपूर वडगाव तेजन शारा टिटवी चिंचोली सांगळे दाभा वढव येथे सर्वात ज्यास्त चुरशीची लढत होणार म्हणून तालुक्याचे संपूर्ण लक्ष या कडे लागले होते .आज तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत च्या मतमोजणी ला सकाळी १० वाजे पासून सुरवात झाली. या मध्ये सरपंच पदाचे निकाल समोर आले. त्या मध्ये सुल्तानपूर येथे सौ किरण हेमराज लाहोटी ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी निवडून आल्या वडगाव तेजन येथे विजय काशीराम तेजनकर सर्वसाधारण साठी या जागेसाठी निवडून आले. धानोरा ग्रामपंचायत साठी रामचंद्र दत्तात्रय पडघाण ना.मा.प्र साठी निवडून आले तर भानापूर येसापूर गट ग्रामपंचायत साठी सौ निर्मला , श्रीराम बोबडे ह्या सर्वसाधारण स्त्री साठी निवडून आल्या शिवणी पिसा या मध्ये सौ अनुराधा समाधान पिसे सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी निवडून आल्या. कारेगाव ग्रामपंचायत साठी नर्मदा विश्वनाथ केंधळे ह्या सर्व साधारण स्त्री या जागेवर निवडून आल्या महारचिकना साठी शिवाजी पंढरी ढाकणे हे सर्वसाधारण जागेवर निवडून आले. ब्राम्हण चिकना या ग्रामपंचायत मध्ये सौ वर्षा रामप्रसाद फडके सर्वसाधारण जागेवर निवडून आल्या तर मांडवा या ग्रामपंचायत मध्ये लक्ष्मी राजू कुहिरे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेवर निवडून आल्या. चिखला ग्रामपंचायत मध्ये गणेश भास्कर काकड सर्वसाधारन या जागेसाठी निवडून आले पळसखेड ग्रामपंचायत मध्ये पूनम राहुल मानवतकर हे अनुसूचित जाती या जागेवर निवडून आले. आरडव या ग्रामपंचायत साठी सौ नीता गजानन सरकटे ह्या ना म प्र या जागेसाठी निवडून आल्या. दाभा या ग्रामपंचायत साठी मारोटी कीसन मोरे हे ना म प्र या जागेसाठी निवडून आले आहेत. जांभूळ या ग्रामपंचायत साठी झयानेश्वर राजाराम जारे हे ना म प्र या जागेसाठी निवडून आले रायगाव या ग्रामपंचायत साठी नंदा रामराव नागरे ह्या ना मा प्र स्त्री या जागेसाठी निवडून आल्या धाड ग्रामपंचायत साठी विलास गोविंदा मोरे हे अनु जाती जमाती या जागेसाठी विजयी झाले आहेत टिटवी या ग्रामपंचायत साठी अनुसया प्रतापराव नरवाडे ह्या अनु जाती स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या आहेत गंधारी या ग्रामपंचायत साठी वैशाली गजानन लांडगे ह्या अ जाती स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या आहेत. गुंजखेड या ग्रामपंचायत साठी प्रल्हादराव तोताराम सुल्ताने हे सर्वसाधारण जागेवर विजयी झाले आहेत. नांद्रा ग्रामपंचायत साठी सौ छाया उत्तमराव सानप ना मा प्र स्त्री या जागेवर विजयी झाल्या आहेत. चोर पांग्रा या ग्रामपंचायत साठी सावित्री शिवलाल राठोड ह्या सर्व साधारण स्त्री या जागेवर विजयी झाल्या आहेत. वढव ग्रामपंचायत साठी मीनाक्षी विजय सोनुने ह्या सर्वसाधारण स्त्री ह्या जागेसाठी विजयी झाल्या आहेत. पिंपळनेर या ग्रामपंचायत साठी सौ कमल अरुण मुंडे ह्या ना म प्र स्त्री या जागेसाठी निवडून आल्या आहेत. गायखेड या ग्रामपंचायत साठी शालीकराम रतन घायाळ हे ना म प्र या जागेवर निवडून आले. आहेत खुरमपूर या ग्रामपंचायत साठी शिवशंकर पांडुरंग भाग्यवंत हे अ जाती जागेसाठी विजयी झाले आहेत. सावरगाव तेली ग्रामपंचायत साठी जगाराव रामसिंग आडे हे सर्वसाधारण जागेसाठी निवडून आले आहेत.
भूमराळा ग्रामपंचायत साठी संतोष प्रल्हाद मोरे ना म प्र या जागेसाठी निवडून आले आहेत तांबोळा ग्रामपंचायत साठी संजय धोंडू राठोड हे सर्वसाधारण जागेवर निवडून आले आहेत. सरस्वती ग्रामपंचायत साठी झानेश्वर भीमराव कडाळे हे सर्वसाधारण या जागेसाठी विजयी झाले आहेत. सावरगाव मुंडे ग्रामपंचायत साठी शारदा संदीप इंगोले ह्या अ जाती स्त्री या जागेवर निवडून आल्या आहेत. बाबूलखेड ग्रामपंचायत साठी सौ संगीता आबाराव हाडे ह्या ना म प्र या जागेसाठी विजयी झाल्या आहेत. शारा ग्रामपंचायत साठी ज्योती ताई भागवत डव्हळे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी विजयी झाल्या आहेत मोतखेड ग्रामपंचायत साठी समाधान देवराव साठे अ जाती हे निवडून आले आहेत. येवती ग्रामपंचायत साठी प्रयाग अर्जुन पाटोळे ह्या अ जाती या जागेसाठी विजयी झाल्या आहेत. चिंचोली सांगळे ग्रामपंचायत साठी सौ सुनीता विलास घुगे ह्या सर्वसाधारण स्त्री या जागेवर विजयी झाल्या आहेत. अजीसपुर ग्रामपंचायत साठी गणेश विश्वनाथ मुकीर हे सर्वसाधारण या जागेवर विजयी झाले आहेत.