गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
देशावर कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रा.स्व. संघाचे स्वयंसेवक नेहमीच मदतीला धावून गेले आहेत. कोरोना संकटात आपणाला समाजाचे काही देणे लागते. सेवा आणि सेवाभाव ही भावना ठेवून जमेल त्या मार्गाने मदत करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेल्हारा तालुका सेवा विभागा कडून तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वनवासी भागातील चंदनपुर, चंदनपुर रेल्वे, बोरवा, नई तलाई, भिली, चिपी, उमर शेवडी, अंबाबरवा, झरी बाजार, खंडाळा, कारला बु. वरील गावांमध्ये गरजू नागरिकांना ग्लुकोज पाकीटाचे स्वयंसेवक कडून वितरण तालुका संघचालक माधवराव बनकर,कार्यवाह प्रवीण उजाळ ,सहकार्यवाह संजय हागे, हरिभाऊ चुंगळे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.
यावेळी संपर्क प्रमुख जितेंद्र लखोटिया, धर्मजागरण प्रमुख दीपक बोहरा,देवेंद्र राऊत, राजेश गावंडे, सेवा प्रमुख अशोक मस्के ,अमोल हनुमंते,शारीरिक प्रमुख रजत अग्रवाल,पराग कुलकर्णी,व्यवस्था प्रमुख डॉ विवेक भालेराव, अनिल कवळकर,मनोज राठी, बौद्धिक प्रमुख विजय भराटे,ज्ञानेश्वर वाघोळे, मनीष येनकर, निरंजन मिसाळ, महाविद्यालयीन प्रमुख मंगेश कसुरकर, ज्ञानेश्वर भगत, ऋषिकेश वानखडे, रवी गावंडे,चैतन्य खारोडे, प्रज्वल भड, आदित्य चिंचोळकर,सागर मस्के, अजय तायडे, तुकाराम, मिसाळ ,मुन्ना ठाकरे,जगन वासकेला, ज्ञानेश,अर्जुन वासकेला, देवलाल महाराज,अनिल सांगूनवेडे या सर्वांनी वितरण करण्यास परिश्रम घेतले.


