औरंगाबाद : भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांचा 78 वा जन्मदिन बुधवारी (30 नोव्हेंबर) प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने शहरात सहा ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्य मराठी कार्यालय, देवगिरी अभियांत्रिकी कॉलेज, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, एमआयटी कॉलेज, एमजीएम विद्यापीठाचे जी.वाय. पाथ्रीकर कॉलेज व वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरांमधून एकूण 428 दात्यांनी रक्तदान केले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिबिराचे उद्घाटन संचालक तथा प्राचार्य डॉ. संतोष भोसले, डॉ. नीलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रा. डॉ. नितीन भालकीकर, प्रा. डॉ. अमित रावते, कुलसचिव प्रा. सचिन लोमटे, प्रा. डॉ. अशोक केचे, प्रा. एम.आर. वैद्य, निकिता नांगरे यांची उपस्थिती होती. सकाळपासूनच विद्यार्थी‘विद्यार्थिनींसह कर्मचाऱ्यांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनीही शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दिवसभरात 113 जणांनी रक्तदान केले. या वेळी प्रा. डॉ. आरती मोहनपूरकर, प्रा. राम चाटोरीकर, प्रा. डॉ. माधुरी पाटील, प्रा. आर.एन. पाटील यांची उपस्थिती होती. दत्ताजी भाले रक्तपेढीचे डाॅ. निवृत्ती वानोळे, जनसंपर्क अधिकारी निवृत्ती मोरे, मनीषा मुसळे, रेवती जोशी, कल्पना झवेरी यांनी परिश्रम घेतले. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिबिराचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम रक्तदान करणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी सिद्धांत म्हस्के यालाही उद्घाटनाचा मान देण्यात आला. दिवसभरात 111 विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापकांनी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले. संस्थेचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विभागप्रमुख राजेंद्र शिंदे, प्रा, अच्युत भोसले, डॉ. जी. आर गंधे, समन्वयक रोहित कोळेकर, मेकॅनिकल स्टुडंट्स असोसिएशनचे समन्वयक रोहित कोळेकर आदींनी परिश्रम घेतले.
कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत 104 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. थॅलेसेमियाग्रस्त, अपघातग्रस्तांना वेळोवेळी रक्ताची नितांत गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांनी केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष भोयर, कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, अशोक आहेर आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, एनसीसी अधिकारी सागर मिसाळ, धनंजय निर्मला यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. श्री सत्यसाई ब्लड सेंटरचे डॉ. महेंद्रसिंग चौहान, डॉ. नंदिनी तिवारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले.एमजीएम विद्यापीठाच्या जी.वाय. पाथ्रीकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. प्राप्ती देशमुख आणि एनएसएसचे संचालक डॉ. आर. आर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी रवींद्र कोमटे, अजय खाके, प्रा.गजानन लोमटे, राफे शेख, विशाखा गारखेडकर, अमित पवार यांचीही उपस्थिती होती. आर.आर.देशमुख यांनी स्वत: रक्तदान करून सुरुवात केली. एकूण ५१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. एमजीएम रक्तपेढीच्या डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. प्रियंका शिंदे, डॉ.स्नेहल भांदरगे, जनसंपर्क अधिकारी गौतम कौरान्ने, सोमनाथ सुलताने, कल्याण पाथरीकर, शंकर वाळुंज, दत्ता वाकडे यांनी परिश्रम घेतले.


