पुणे : कामाकरिता एका महिलेने साेन्याचे दागिन्यांवर कर्ज घेतले. परंतु ते कर्ज फेडण्याकरिता तिला पैशाची गरज असल्याने तिने एका खाजगी सावकाराकडून पाच टक्के व्याजाने 25 लाख रुपये प्रती सव्वा लाख रुपये महिना व्याजाने सहा महिने बोलीवर घेतले. त्याची ठराविक मुदतीत परतफेड करुनही आणखी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारास पोलिसांनी जेरबंद केले आहे. अशी माहिती गुरुवारी दिली. संताेष अशाेक लाहाेटी (वय-45,रा.शुक्रवार पेठ,पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी शितल संताेष लाहाेटी हिचेवर देखील पोलिसांनी भांदवि कलम 452,504, 506,34 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 39,75 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी 2018 ते आजपर्यंत घडलेला आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात वैशाली उमेश देशमुख (वय-45,रा.कात्रज,पुणे) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार वैशाली देशमुख यांनी घेतलेल्या गाेल्ड लाेन फेडकरिता त्यांना पैशाची गरज हाेती. त्यामुळे त्यांनी आराेपी संताेष लाहाेटी याचेकडून पाच टक्के व्याजाने 25 लाख रुपये प्रति एक लाख 25 हजार रुपये महिना व्याजाने सहा महिने बाेलीवर घेतले. सिक्युरीटी म्हणून त्यांनी त्यांचा फ्लॅट घेवून सहा महिन्यानंतर डीड ऑफ असायनमेंट तक्रारदार यांचे नावावर करुन देण्याचे ठरले हाेते. ठरल्या प्रमाणे तक्रारदार यांनी घेतलेली सर्व रक्कम परत केली परंतु त्यानंतर देखील आराेपीने आणखी पाच लाख रुपयांची मागणी करुन त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करुन फ्लॅटचा बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पुढील तपास युनिट तीनचे पोलिस करत आहे.
संचित रजेनंतर कारागृहात परत न गेल्याने बंदीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल अंकुश पारगे (30, रा. साईराम पारगे रेसिडेन्सी, कर्वेनगर,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह शिपाई शिवाजी रावसाहेब गायकवाड (53, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पारगे या बंद्याला 21 ऑक्टोबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 अशी 28 वर्षांची संचित रजा मंजुर करण्यात आली होती. परंतु, पारगे 28 दिवस पुर्ण होऊनी कारागृहात परत आला नाही. त्यामुळे त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.