हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आगामी काळात सण उत्सव नसल्यामुळे क्राइम कंट्रोल वर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाली की हिंगोली जिल्ह्यांमध्ये क्राइम कंट्रोल वर पोलिसांचा भर असणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला आवश्यक सूचना देण्यात आले असून दिवसा सोबतच रात्रीची गस्त परिणामकारक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असून वेळोवेळी त्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. गुन्हेगारांचे संशयास्पद वर्तन आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर कडक कारवाई केली जाईल. बेकायदेशीर दारू विक्री व अहवाल व्यवसायाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई देखील केली जाणार असल्याची त्यांनी स्पष्ट केली. या कारवाईतून अवैध व्यवसायावर आळा बसविला जाणार आहे.
यासोबतच शाळा महाविद्यालय सोबत शिकवणी वर्गाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस पथक तैनात केले जाणार असून दामिनी पथकाची ही या भागात गस्त राहणार आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या 112 क्रमांकाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा पासून वेळोवेळी लोकेशन घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.