राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
भामरागड – लगतच्या पर्लकोटा नदीवर केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरण कडून उंच पुलाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे, त्या पुलाचा पोचमार्गासाठी भामरागड येतील मुख्य मार्गावरील १२४ दुकानदारांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, परंतु अद्याप त्या कारवाईला प्रशासनाकडून सुरवात झालेली नाही, लवकरात लवकर संपूर्ण बाजारपेठेचे नवीन सुरक्षित जागेवर पुनर्वसन करा ह्या प्रमुख मागणीसाठी गेल्या ५ दिवसांपासून भामरागड कडकडीत बंद आहे, तसेच व्यापारी संघटनेकडून उपोषणालाही सुरुवात करण्यात आली होती. ह्याची माहिती मिळताच काल माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी भामरागड येते जाऊन त्रिवेणी व्यापारी संघटना तथा गावकऱ्यांसोबत सोबत एक बैठक घेऊन तब्बल दीड तास सविस्तर चर्चा केली.
व्यापारी संघटनेचा मागणी रास्त असून, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, लवकरच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन ह्या विषयांवर पाठपुरावा करून लवकरच संपूर्ण बाजारपेठेचे पुनर्वसन करू अशी ग्वाही माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना आणि गावकऱ्यांना दिली. व्यापारी तथा गावकऱ्यांसह नवीन पुलाचे काम तथा बाजारपेठ पुनर्वसनासाठी प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या जागेची पाहणी करून पूर्ण माहिती घेतली, ह्यावेळी युवा नेते अवधेशराव आत्राम, प्रवीणराव आत्राम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री प्रशांत मद्दीवार, त्रिवेणी व्यापारी संघटना भामरागडचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, जाधव हलधर सह अनेक व्यापारी तथा भामरागड येतील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.