गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोट निवडणुकी करिता तेल्हारा तालुक्यामधील रिक्त झालेल्या तीन जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 17 तर चार पंचायत समिती गणा मधून 18 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तेल्हारा तहसीलवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.तेल्हारा तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये दानापूर जिल्हा परिषद मतदार संघातून 6 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे ,अडगाव बु. जिल्हा परिषद मतदार संघातून 6 तर तळेगाव बु. जिल्हा परिषद मतदारसंघातून 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे तालुक्यातील वाडी अदमपुर पंचायत समिती गणा मधून 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे भांबेरी पंचायत समिती गण मधून 5 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे अडगाव बु. पंचायत समिती गणा मधून 6 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे तर हिवरखेड पंचायत समिती गणा मधून 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे अशाप्रकारे तेल्हारा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटामध्ये 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर चार पंचायत समिती गणा मधून 18 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार घोषित न केल्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेल्हारा तहसील कार्यालयावर एकच गर्दी झाल्याचे दिसून आल