निलेश किरतकार
मुख्य संपादक , अकोला
अकोला : शहर वाहतूक शाखेच्या इतिहासातील सर्वोच्च कारवाया।।
शहर वाहतूक शाखा अस्तित्वात आल्या पासून आता पर्यंतच्या सर्वोच्च कारवाया ह्या वर्षी च्या पहिल्या सहा महिन्यात करण्यात आल्या असून, अकोला शहरातील वाहतूक सुरळीत करीत असतांनाच वेग वेगळ्या मोहिमा व उपक्रम राबवून तसेच महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार करोना चा निर्बंध व संचारबंदी राबवित असतांना ह्या जम्बो कारवाया केल्या आहेत हे विशेष।
ह्या वर्षी 1 जानेवारी ते 30 जून ह्या सहा महिन्यात शहर वाहतूक शाखेने तब्बल 60316 दंडात्मक कारवाया करून 41 लाखाचे वर महसूल वसूल केला असून सदर कारवाया आता पर्यंतच्या सर्वोच्च कारवाया आहेत।मागील 10 संपूर्ण वर्षाच्या दंडात्मक कारवाया पाहता त्या खालील प्रमाणे।1) 2012- कारवाया- 43440 वसूल दंड- 6378650
2) 2013 कारवाया 31513 दंड वसूल- 4550300
3)2014- कारवाया- 33989, वसूल दंड- 4639800
4)2015- कारवाया-43510, वसूल दंड- 5830350
5)2016- कारवाया-50344 वसूल दंड- 7778800
6)2017- कारवाया-57319, वसूल दंड- 14382700
7) 2018- कारवाया-63567 वसूल दंड-15806400
8) 2019- कारवाया-59556, वसूल दंड- 12258900
9)2020- कारवाया-74128, वसूल दंड- 7194600
वरील कारवाया ह्या संपूर्ण वर्षा च्या असून 2021 मध्य पहिल्या सहा महिन्यातच 60,000 चे वर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
2019 च्या मे महिन्या पासून वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाया साठी इ चालन मशीन चा वापर करण्यात येतो, ज्या मध्ये चालन करते वेळी वाहन चालक हजर नसेल तर किंवा त्याचे जवळ त्या वेळी दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तो नंतर महाराष्ट्रात कोठेही ह्या दंडाची रक्कम भरू शकतो ही सवलत देण्यात आल्याने अश्या बाकी असलेल्या दंडाच्या रकमेचा आकडा सुद्धा मोठा आहे, ही बाकी असलेल्या दंडाची वसुली करण्यासाठी अश्या वाहन चालकांच्या निवास स्थानी लेखी नोटीस वाहतूक शाखे कडून पाठविण्यात येत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।
नमूद दंडात्मक कारवाया पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलीस अंमलदार ह्यांनी केले।