विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : कित्येक दिवसापासून मुस्लिम समाजाच्या शादी खाना साठी समाज बांधवांनी प्रत्येक लोक प्रतिनिधींना शादी खाना व्हावा यासाठी विनवणी केली असता कोणत्याच लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी शादी खाना देण्यासाठी फक्त आश्वासन दिल्यामुळे आज पर्यंत शादी खाना समाजासाठी मिळाला नाही त्यामुळे गावातील सर्व मुस्लिम समाजातील बांधव आ.अमोल मिटकरी यांना दि.१ आक्टोंबर रोजी आमदार अमोल मिटकरी यांना सर्व मुस्लिम समाजाचे बांधवांनी पातुर नंदापूर च्या शादी खाण्यासाठी निवेदन दिले जिल्हा परिषद निवडणुकी च्या प्रचार दौऱ्या निमित्त आले असता मुस्लिम समाज बांधवांना शादी खाण्याचेआश्वासन दिले होते.अमोल मिटकरी यांनी आज आश्वासनाची पूर्तता केली.असता सर्व मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भावना समजून घेता आमदार अमोल दादा मिटकरी यांनी शादी खाण्यासाठी २० लक्ष रुपयाचा आमदार स्थानिक विकास निधी मंजूर करण्यात आला. पातुर नंदापूर ते सरपंच सचिन लाखे हे या विकास कामाच्या निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल एक वर्षापासून झटत असल्यामुळे त्यांच्या कामाला यश आले आहे. शादी खान मिळावा यासाठी पातुर नंदापूर मधील राष्ट्रवादीचे १२० कार्यकर्ते आमदार अमोल दादा मिटकरी यांना भेटले असता त्यांनी या कामांना मंजुरी दिली आहे त्याबद्दल सर्व पातुर नंदापूर वाशी यांनी आभार मानले याप्रसंगी राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष विकी लाखे, महिला तालुका अध्यक्ष दीपमाला खाडे, सरपंच सचिन लाखे, वसंत खडसे, व असंख्य गावातील प्रतिष्ठित नागरिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर होते.