सोलापूर : सराफ व्यावसायिक अमोल भारत महामुनी, वैभव महामुनी (रा. रेवणसिद्धेश्वर नगर, होटगी रोड, सध्या रा. पापरी) यांनी एकूण ८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद मयूर बलभीम जाधव (वय ३१, रा. संतोष नगर, बाळे) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाळे येथे सद्गुरू ज्वेलर्स दुकानाचे मालक महामुनी यांच्याकडे सोन्याचे ब्रेसलेट व चेन बनविण्यासाठी मयूर जाधव यांनी पैसे दिले. दागिन्यासाठी दिलेले साडेपाच लाख रुपये, तसेच घर खरेदीसाठी दिलेले २ लाख ७० हजार रुपये अशी रक्कम डिसेंबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत दिली. सोन्याचे दागिने व घर खरेदी करून दिले नाही. पैसेही परत केले नाहीत. फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.