गणेश देशमुख
ग्रामीण प्रतिनिधी नांदगांव
सोलापूर : येथील जागतिक लिंगायत महासभा सोलापूर शहर शाखा च्यावतीने श्रावण मास निमित्त आयोजित एक दिवसीय प्रवचन प्रसंगी बसवकल्याण चे पूज्य म. नि. प्र. श्री. बसवप्रभू महास्वामीजी यांनी सैफुल येथील मारुती मंगल
कार्यालयात ‘समतानायक महात्मा बसवण्णा’ या विषयावर बोलताना वरील विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना स्वामींजींनी महात्मा बसवण्णा यांचे “माझ्याहून नसे कोणी सान, शिवभक्ताहून नसे कोणी थोर” या वचनाचा देखील दाखल दिला. बसवण्णांनी माणसा – माणसातील भेदभाव नष्ट करण्याकरिता आयुष्य वेचले, जाती ने माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरत नाही हे वेळोवेळी स्वतःच्या वचन मधून आणि सर्वांना ‘अनुभव मंटप’ मध्ये सामावून घेऊन त्यांनी दाखवून दिले. अनुभव मंटप मध्ये सर्वांना प्रवेश दिला जात होता. प्रवेश देताना जात अथवा स्त्री – पुरुष असा भेदभाव देखील केला जात नव्हता. स्त्रियांना देखील महात्मा बसवण्णांनी समतेचे अधिकार ‘अनुभव मंटप’ च्या माध्यमातून मिळवून दिले. हे सांगितले तसेच बसवण्णा यांनी समता तत्वाचा प्रसार कसा केला हे अनेक घटना सांगून त्याद्वारे सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिरीष तुंबळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीशैल हत्तुरे, शिवानंद नसली, सिंधुताई काडादी हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विजय भावे, विश्वजित हेले, मल्लिकार्जुन मुलगे, शिवराया तेली, संगमेश्वर निलांगीकर, अमोल पाटील, राहुल निलाखे, लक्ष्मण चलगेरी, नागेंद्र कोगनुरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर स्वामी यांनी , सूत्र संचालन डॉ भीमाशंकर सिंदगी यांनी केले तर आभार राजेंद्र खसगी यांनी मानले.


