वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
तालुका अध्यक्षपदी सीमा बाळबुद्धे तर सीमा पोहेकर उपाध्यक्षपदी,सचिव पदी अरुणा बद्दर
बाभुळगाव दि.१ जुलै -:भारतीय नारी रक्षा संघटना गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील महिला व मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा देत असून आजपर्यंत त्यांनी अनेक महिला व मुलींना आपल्या संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला असून वेळोवेळी हवी ती मदत भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने महिला व युवतींना केलेली आहे.याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भारतीय नारी रक्षा संघटनेचे कार्य सुरू असून यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात ठिकाणी भारतीय नारी रक्षा संघटनेची कार्यकारिणी गठित करण्याचे कार्य सुरू आहे.याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली.बाभुळगाव पोलीस स्टेशन लगत असलेल्या दुर्गा माता मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीत भारतीय नारी रक्षा संघटनेच्या बाभूळगाव तालुका अध्यक्षपदी सौ. सीमा बाळबुद्धे तर सौ.सीमा पोहेकर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिव सौ.अरुणा बद्दर,सौ.सुनीता गुप्ता कोषाध्यक्ष,सौ.वनमाला पांडे सहसचिव,सचिव सौ.प्रिया मिश्रा यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नारी रक्षा संघटनेचे मार्गदर्शक श्री वसंतरावजी कंगाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाभुळगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिलीपजी वडगावकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुकांत श्री.सुकांतजी वंजारी,श्री.विनोदजी दोंदल,सौ.दुर्गाताई पटले,सौ.संतोषी राजजी वर्मा यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असुन या कार्यक्रमाला श्री.राजजी वर्मा,पोलीस काँस्टेबल श्री.नांदेकर सौ.मालती गावंडे,सौ.संगीता सरोदे,सौ.मंगला चन्ने,सौ.रूपाली फूलकर,श्रीमती अनिता बद्दर,सौ.अरुणा शर्मा,सौ.रज़िया सिद्धिकी,सौ.ललिता वर्मा,सौ.सुनीता गुप्ता,सौ.जयश्री गिरी,सौ.मीना वर्मा,सौ.प्रिया मिश्रा,सौ.दीक्षा खंडारे,सौ.मोहिनी खोडे,आकांक्षा वर्मा,हसरी चन्ने,अदिती फूलकर,भक्ति मिश्रा,सुमेधा गुप्ता,मुक्ता मिश्रा,आस्था गुप्ता,मयूर पिसे,अनिकेत पोहोकर,सोनू शर्मा,प्रीतम सोनवने,उमेश वर्मा,नागोसे आदींच्या उपस्थिती होती.