अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
दि अकोला मध्यवर्ती सहकारी बँक लि अकोला जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशी शाखेत डिजिटल आर्थिक साक्षरता अंतर्गत जनजागृती कार्यक्रम पार पडला.
ग्रामीण भागातील जनतेला डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यासाठी जिल्हा बँके आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती मेडशी शाखेत जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख जमिरभाई शेख चाँदभाई यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्केटिंग ऑफिसर विशाल काटेकरयांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदराव मेडशिकर, तपासणी अधिकारी राहुल घोडेस्वार अकोला ,शाखाधिकारी विनोद खुळे,निरीक्षक आझिम कुरेशी, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष संजयराव घुगे,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण, उत्तमराव देशमुख ,श्रीराम तायडे, सुभाष तायडे,गोरख भागवत,अजय चोथमल,सोहेल पठाण आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोखपाल महेश राऊत,लिपिक केशवराव घुगे, गणेश ठाकरे, प्रशांत ठाकरे,जगदिश बहादूरे संतोष साठे,संतोष साठे,बळी तायडे,वैभव संतोष साठे आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला, खातेदार आणि ग्रामस्थाची उपस्थिती होती.










