मुंबई (Mumbai) : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.
संजय राऊतांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. अशातच त्यांचा दिनक्रम समोर आला आहे.
ही बातमी पण वाचा : ५३ टक्के भारतीयांना पुन्हा मोदींना पंतप्रधान होताना पहायचं आहे!
संजय राऊत यांचा कैदी क्रमांक ८९५९ (prisoner number 8959) आहे. त्यांना सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. ते तुरुंगातील ग्रंथालयाचा वापर करत असतात. रोज वर्तमानपत्र, पुस्तकांचे वाचन आणि टीव्हीवर बहुतांश वेळ बातम्या बघत असतात. पत्रकार म्हणून लिहिण्याचा छंद असल्यामुळे त्यांना वही आणि पेन पुरवले जाते. त्यामुळे ते दिवसभर लिखाणात व्यस्त असतात. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण आणि औषधे दिले जाते. त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी तुरुंग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये भेटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना तशी परवानगी नाकारण्यात आली.