अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नुकतेच शालेय विद्यार्थ्यांकरिता गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कु. वंदना सरप होत्या,तर प्रमुख पाहुण्या म्हणून पालक प्रतिनिधी सौ.वैशाली कुटे , सौ.श्वेता आयस्कार ,सौ.ममता उमाळे, सौ.पुजा कावस्कार , सौ. स्वाती गुलालकरी , सौ.बगाडे ताई , सौ.अर्चना फुलारी , सौ.अनिता ठक , अर्चना बागडे , सौ. संजीवनी राऊत यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्षा आणि प्रमुख पाहुण्यांचे हस्ते माता सरस्वती प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्षा यांचे हस्ते वर्ग 1 ते 7 मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला.उपस्थित महिला प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्ययक्त केले.त्यामध्ये त्यांनी शिक्षण ,शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे संचालन डाखोरे सर यांनी केले तर आभार राठोड सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद देशमुख मॕडम , लखाडे मॕडम ,श्री सानप सर ,श्री .सिरसाट सर , श्री .राठोड सर , श्री .घोरे सर पोहरेताई यांनी सहकार्य केले.


