शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मूर्तिजापूर : दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व नोटबुक देण्यात आली आतापर्यंत शाळेचे तीन वर्ग (3डिजिटल क्लासरूम) झालेले आहेत. सदर कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार माननीय श्री हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, मुख्य अधिकारी मॅडम श्रीमती सुप्रिया टवलारे मॅडम, नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री सुभाष म्हैसने सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपे सर, सौ. शुभांगी येऊल मॅडम, श्री विशाल अंबळकार सर, श्री दीपक हांडे कॉन्व्हेंटच्या शिक्षिका कु.खुशबू महाजन मॅडम, सौ.रुची दुबे मॅडम श्रीमती अनिता देवके, सौ.सुषमा बाळापुरे इतर सर्व स्टाफ मुर्तीजापुर शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधु सर्व शिक्षक वर्ग नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते