अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : दिनांक 12 ऑगस्ट 2022 स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर, येथे हर घर तिरंगा आणि वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पातुर शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीला हिरवी झेंडी प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत यांनी दिली. या रॅलीमध्ये 1000 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’ अशा अनेक प्रकारच्या घोषणा देत लोकांना हर घर तिरंगा बद्दल माहिती दिली.रॅलीमध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय नाफडे, उपनिरीक्षक रत्नपारखी साहेब, पोलीस हवालदार गजानन पाचपोर , वसंत राठोड, सचिन पिंगळे साहेब ,धर्मेंद्रसिंह ठाकुर, अभिजीत आसोलकार, योगेश गेडाम सहभागी होऊन रॅली करिता सहकार्य केले. त्यानंतर विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘मोफत गणवेश वाटप’ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहीलोत, सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे, पर्यवेक्षक एम बी परमाळे आणि विपिनसिंह गहीलोत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर व आभार प्रदर्शन प्रा. निलेश पाकदूने यांनी केले.


