सतिश मवाळ
प्रतिनिधी मेहकर
मेहकर तालुक्यातील कळपविहीर ते शिवणी रस्त्यावर पावसामुळे पुल जमीन दोस्त झाला होता शेतकऱ्यांनी सदर रस्ता लोकप्रतिनिधी संबंधित विभाग लघु पाटबंधारे महसूल इ यांणी लक्ष देऊन करून देण्याबाबत अपेक्षा होती.त्यांच्याकडे कोन्ही लक्ष देत नसल्याने शेवटी शेतकरी राजा प्रशासकाची वाट पाहून थकला .कोरोणा माहारी सारख्या संकटामुळे हतबल झालेला शेतकरी . लोकवर्गणी करून
कळपविहीर ते शिवणी जाणारा रस्त्यावरचा पुल जमीन दोस्त झाला होता .त्या पुलांमध्ये लोकवर्गणी करून
दगड ट्रॅक्टर जेशिपी व अंग मेहनत करून भरला आहे.
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्याय रस्ता नसल्याने कोण लक्ष देत नसल्याने शेतामधील कामे रखडल्याने शेतकऱ्यांनी लोक वर्गणी करून च पुढाकार घ्यावा लागला आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.लोकप्रतिनिधी , संबंधित विभागाने प्रशासन यांच्या कडून झालेल्या पुलाच्या दुरुस्ती ची अपेक्षा होती.पन तसे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी कडून झाले नाही.
, सार्वजनिक कामाची सर्व सामान्य लोकांणी अपेक्षा कोणाकडून करायला पाहिजे असे मत ,श्रिकिसन तांगडे,आरुन दगडू तुपकर,माणिकराव सरकटे,प्रकाश साहेबराव तांगडे,पांढरी तांगडे,देविदास तांगडे,आचुत दशरथ तांगडे,नारायण सरकटे , इ परिसरातील शेतकऱ्यांना नी व्यक्त केला आहे.