मुंबई : शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. आसाम विमानतळावर पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर आणखी १० आमदार आज येणार असल्याचंही म्हटलं आहे.