मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.
विधान परिषदेचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी– प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (२८ मते)
काँग्रेस -भाई जगताप (२६ मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत – २२ मते)
भाजपाचे प्रसाद लाड विजयी; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत
विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस होणार होती. मात्र दोन्ही उमेदवार निवडून आले असून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांसाठी काटे की टक्कर
काँग्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ मते, तर भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत. काँग्रेसकडे एकूण ४४ मते असून देखील दोघांच्या मतांची बेरीज कमी भरत आहे. भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मतं मिळाली आहेत.
विधान परिषदेचा निकाल ; कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी- सचिन अहिर, आमशा पाडवी
भाजपाचे विजयी उमेदवार- प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला आहे.


