अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर – भारतीय रिझर्व्ह बँक ,बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या साहाय्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र गावपातळीवर कार्य करीत आहे.पातूर नजीकच असलेल्या ग्राम बोडखा येथे मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी कार्यक्रमाला अभिनव कुमार सर,भारतीय रिझर्व्ह बँक नागपूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा सर, मनोज मेहर सर,आर सेटी डायरेक्ट अकोला उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यशाळे ची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यशाळेला स्वयंसहायता समूहातील महिलांना वित्तीय साक्षरता काळाची गरज ,आर्थिक नियोजन ,नियमित बचत आदी विषयी मार्गदर्शन सिन्हा सर यांनी केले ,तसेच पत इतिहास आणि कर्ज या विषयी चे मार्गदर्शन अभिनव सर यांनी केले.यावेळी त्यांनी कर्ज घेण्याचा उद्देश ,कर्जाचा सुयोग्य वापर, नियमित परतफेड व सिबील याविषयी सविस्तर रित्या माहिती दिली. सोबतच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था या विषयी मेहर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,संस्थेच्या अंतर्गत चालणारे मोफत व्यवसायिक प्रशिक्षण बद्दल यावेळी माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे आयोजन मनिवाइज केंद्र चे विदर्भ एरिया मॅनेजर मा.सत्यपाल चक्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी केंद्र व्यवस्थापक किशोर चक्रनारायण यांनी संचालन केले व आभार क्षेत्र समन्वयक संगीता अवचार यांनी मानले. सदर कार्यशाळा यशस्वीते साठी बबिता खंडारे, सुनीता सुरवाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.











