अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : सेवा सहकारी संस्थेच्या मंडळाची निवडणूक 30 मे रोजी पार पडली.यावेळी अध्यक्षपदी अबुल हसन खान तर उपाध्यक्षपदी प्रा. विलास राऊत हे विजयी झाले.सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत अबुल हसन खान यांना 9 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिराबाई रामदास तायडे यांना 4 मते मिळाली.तर उपाध्यक्षपदाची निवडणुकीत प्राध्यापक विलास राऊत यांना 9 मते मिळाली. तर डॉ. सुनील प्रल्हाद आवटे यांना 4 मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर. घोडके यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये अध्यक्षपदी अबुल हसन खान,तर प्रा.विलास राऊत यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली.यावेळी संचालिका स्नेहप्रभादेवी गहिलोत, संचालक विजयसिंह गहिलोत , गोपाल पुरुषोत्तम, हरिष बोचरे, रमेश निमकंडे, गफार खान, सत्तार खान,हैदर खान, यावरखान, दिपक धाडसे, सुनील आवटे,अशोक चुनडे इत्यादी उपस्थित होते.


