शरद भेंडे.
तालुका प्रतिनिधि
अकोट -रामपूर येथील गट ग्रामपंचायत ही आदीवशी बहुल असुन पाच गावचे काम रामापुरातुन चालते.ग्रा.पं.बरखास्ती नंतर गावचा कारभार पाहण्यासाठी शासनाने शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त केले आहेत. सदर कर्मचारी शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी जावे जावे की प्रशासक म्हणून नियुक्ती केले त्या गावी जावे अशी परिस्थिती उद्भवली आहे.एका व्यकतीकडे दोन-तीन ग्रामपंचायतचा कारभार देण्यात आला असुन गट ग्रामपंचायत असलेल्या रामपूर ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून याबाबत भेटावं तर कोणाला असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आठवड्यातून एक-दोन वेळा एका तासासाठी येणारे प्रशासक केव्हा येतात आणि कधी जातात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्याने गावातील शेतकरी व शेतमजूर दिवसभर शेतात असतात,प्रशासक व ग्रामसेवक यांचे येण्याच्या नक्की दिवस व वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकांना आपली मजुरी बुडवून या शासकीय कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते.आता पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्या साफसफाई व ग्रामपंचायत चे इतरही गावातील कामे सुद्धा तशीच पडली आहेत . काही गावातील स्ट्रीट लाईट बंद असून रस्त्यावर अंधार पडलेला आहे .तरीसुद्धा या कोणत्याच कामाची ग्रामसेवक यांनी कोणतेही देणंघेणं नाही कोरोना काळातही कोणते विकास कामे केली गेल्या नाहीत. ज्यांच्यावर ग्राम विकासाची मुख्य जबाबदारी असते ते ग्रामसेवक रमेश पायघन यांचा सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वाटेल तेव्हा येणे-जाणे असला कार्यक्रम सुरू असल्याचे बोलले आज जाते.त्यामुळे ग्रामविकास मात्र पूर्णपणे वार्यावर आहे. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस अजून गावातील समस्या निकाली काढावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.