विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
या आरक्षणामुळे २५ हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे.
अकोला : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण (Akola Election Reservation 2022) आज जाहीर झालं. आजच्या नव्या आरक्षणामूळे दिग्गजांना फटका बसला असून अकोल्याचे भाजप उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित निश्चित झाले. तर भाजपचे सभागृह नेते राहूल देशमुखांचा प्रभाग महिलेसाठी राखीव झाले. या आरक्षणामूळे २५ वर विद्यमान नगरसेवकांना निवडणूकक रिंगणाबाहेर राहावे लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहे. तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहे.
या आरक्षणामुळे २५ हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण ७४ जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. एकुण ९१ जागांमधील ४६ जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना ८ जागा अनुसुचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी जाहिर झाली. तर उर्वरित ३७ जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर झाल्या. दरम्यांन, महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
अनुसुचित जाती माहिलांसाठी आरक्षित जागा.
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवाराकरीता आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहिर झालं. यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाले. ज्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ, आणि २३-अ जागा आहे.
अनुसूचित जमातीसाठी ‘२४-अ’ हि जागा महिला राखीव करण्यात आलीय.
सर्वसाधारण महिलांसाठी असे आहेत आरक्षित जागा.
सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या. ज्यामध्ये १-अ, ५-अ, ७-अ, ८-अ, ११-अ, १३-अ, १५-अ, १६-अ, १७-अ, २१-अ, २२-अ, २६-अ, २८-अ, तर ‘ब’ जागांसाठी २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ९-ब, १०-ब, १२-ब, १४-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २३-ब, २४-ब, २५-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब या ३० जागा आरक्षित झाल्या होत्या.
तर उर्वरित ७ जागा ‘ज्या’ प्रभागात २ जागा अनारक्षित आहे. त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहे. ज्यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब हे जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. असे एकत्रित ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले.