किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : आकाश विजय उपर्वट या युवकाचे नाव असुन तिच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत. शहरातील भिमनगर येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज दि.30 मे 2022 रोजी सायं. 7:00वाजताच्या सुमारास पातूर शहरातील भिमनगर येथे एका युवकाने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असता नातेवाईकांनी पातूर पोलिसांना माहिती दिली.सदर युवक हा आकाश विजय उपर्वट रा.भिमनगर, पातूर येथील असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. यावेळी मंगेश डोंगरे,बंटी कीरतकार,सूरज धाडसे, पत्रकार दुले खान,यांनी मृतदेह खाली उतरविण्यासाठी मदत केली.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.भास्कर इंगळे,पो.हे.कॉ. गजानन पाचपोर,पो.कॉ.अभिजित आसोलकर,पो.ना.पंजाबराव चराटे,सचिन दळवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.