किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : भारताचे स्वाभिमानी व देशभक्त असे राष्ट्रपुरुष हिंदूसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती नुकतीच २५ मे या तारखेला पातुर येथील तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,नगरपरिषद कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण व त्यांना अभिवादन करून प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. येणा-या २ जून ला सुद्धा येथील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती दुस-यांदा साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार दिपक बाजड यांनी पातुर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांना यावेळी दिली आहे असे बायस यांनी लोकमत प्रतिनिधी यांना कळविली आहे.याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी सांगितले आहे की महाराणा प्रतापसिंह यांची जयंती प्रशासनाच्या वतीने शहरात दोन वेळा शासकीय कार्यालयात साजरी होणे ही आपल्या सर्वांसाठीच गर्वाची बाब आहे.या राष्ट्रपुरुषाची जयंती रोज साजरी करावी एवढा त्याग व बलिदान त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केला आहे.मुगलांची गुलामी न पत्करता त्यांच्याशी एकाकी झुंज देत मुघलांच्या ताब्यात असलेल्या आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी,आपला देश व धर्म वाचवण्यासाठी प्रसंगी राजमहालाचा व तेथील सुख सुविधांचा त्याग करत अरावलीच्या घनदाट जंगलात जाऊन नेहमी मखमली गाडीवर झोपणारा राजा गवतावर झोपतो आणी रोज पंचपक्वान खानारा,जंगली पालेभाज्या खाऊन आपले पोट भरतो अशा देशभक्त व स्वाभिमानी महाराणांचा आदर्श जगापुढे आपल्याला बघायला व ऐकायला मिळतो. राज्यशासनानी काढलेल्या पहिल्या अध्यादेशात महाराणा प्रताप यांची जयंती २५ मे २०२२ ला साजरी करण्याचे आदेश होते परंतु महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० मध्ये झाला होता म्हणून तारखेनुसार त्यांची जयंती ९ मे ला येते व तिथीनुसार २ जून ला येते.शासनाच्या ही बाब ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने पहिल्या काढलेल्या अध्यादेशात बदल केला व ५ मे २०२२ ला काढलेल्या अध्यादेशात २५ मे ऐवजी २ जून असा बदल केला.परंतू प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे तो आदेश राज्य स्तरावरून तालुका पातळीवर न पोहोचल्याने तालुक्यात पहिल्या अध्यादेशानुसार २५ मे ला महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली गेली.ही बाब बायस यांनी पातुरच्या तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिली व सुधारित अध्यादेश ही दिला त्यावेळी त्यांनी नविन अध्यादेशाप्रमाने २ जून ला ही आपल्या कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशासनाचा सर्व सामान्य नागरिकांना गोंधळात टाकण्याचा कारभार कसा या राज्यात सुरू आहे ते परत एकदा उजेडात आल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.











