तात्काळ मार्ग न काढल्यास आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आज दिनांक २९जून रोजी तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत निष्ठुर शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात एकजूट दाखवून आज सकाळ पासूनच आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आज सकाळ पासूनच तेल्हारा शहरात शुकशुकाट पाहण्यास मिळाला आहे.तेल्हारा तालुक्यातील अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यावर उन्हाळ्यात सुद्धा वाहन चालवणे कठीण झाले होते आता तर पावसाळा आहे त्यामुळे सर्व रस्त्यांवर चिखल माखलेला आहे या रस्त्यावर वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे, या रस्त्यांनी अनेकांचे जीव घेतले तर काहींना कायमचे अपंगत्व आले तरी सुद्धा लोक प्रतिनिधी व शासनाला जाग आली नाही.शेवटी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शेकडो निवेदने दिली तरी सुद्धा झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जाग आली नाही, २६ जून रोजी तालुक्यातील युवक विशाल नांदोकर यांनी आमरण उपोषनाचा मार्ग अवलंबला आणि ह्यांना सर्वच स्तरातून जनतेने साथ दिली असून आज २९ जूनला सर्वांनी एकजुटीने तेल्हारा तालुका बंद ची हाक दिली आणि आज सकाळ पासुन संपूर्ण शहर लॉक डाऊन झाले शासन प्रशासनाने ह्या बाबीची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी यावर तात्काळ निर्णय घेण्यात येईल का?