सावरकर नगर परिसरातील घटना
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.29:- भद्रावती शहरातील सावरकर नगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२८ रोज सोमवारला सात वाजताच्या सुमारास शहरातील सावरकर परिसरात घडली.कार्तिक दिलीप बोंडे असे मृतक मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे परिसरात तथा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे आत्महत्ये मागचे कारण कळू शकले नाही. मृत्यूच्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत दिवसभर शहरात भटकल्यानंतर सायकाळच्या वेळेस त्याने आत्महत्या केली. सदर घटनेची भद्रावती पोलिसांनी नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ते करीत आहे.