वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगांव अंतर्गत अंगणवाडी केन्द्रांतील दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून विहीत मुदतीत अर्ज सादर करणार्या पात्र लाभार्थींपैकी काही लाभार्थींना माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुदतठेवी प्रमाणपत्रांचे वाटप किर्तिकुमार कटरे बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगांव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यालयाचे विस्तार अधिकारी सागर विठाळकर तसेच पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना तडस, सुनिता बेरड, संजिवनी ओंकार, निशा पाटील, मंजुश्री खसाळे,महेंद्र केवटे, मोहन भोरे, सुरेश रामगडे, आदी उपस्थित होते. उर्वरित लाभार्थींना लवकरच मुदतठेवी मिळेल असे सांगुन राळेगांव तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थींनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक अंगणवाडी सेविका तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी ए बा वि से यो कार्यालय राळेगांव यांच्याशी सम्पर्क साधावा असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार कटरे यांनी केले….