दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद: औरंगाबाद येथील सिडको एन 7 परिसरातील एका दुकानासमोर पांघरून घेऊन झोपलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तिघांपैकी एकाला सिडको पोलिसांनी रविवारी (ता 27) जून रोजी रात्री 8 च्या सुमारास अटक केली.आकाश उर्फ टोंग्या भगवान तुपे (वय 20 रा.सिडको एन 7) असे आरोपीचे नाव आहे.त्याला 30 जून पर्यंत पोलिस कोठडित ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू.न्याहारकर यांनी सोमवारी (ता 28) दिले.
प्रकरणात रमाकांत वैजनाथ निषाद (रा गणेश नगर, गारखेड़ा)यांनी फिर्याद दिली.त्यानुसार निषाद यांचे एन 7 येथे दुकान आहे. त्यांनी दुकानाच्या बाहेर सीसीटीवी क्यामेरे बसवले आहेत.27 जून रोजी नेहमी प्रमाणे ते सकाळी साडे नऊच्या सुमारास दुकानात आले.त्यांनि दुकानातले सीसीटीवी तपासले असता,रस्त्याने फिरणारी एक भोळसर महिला त्यांच्या गैलरी मधे पांघरुन घेऊन झोपलेली होती. रात्री एक सव्वा च्या सुमारास एक व्यक्ति तेथे आला आणि त्याने भोळसर महिलेवर अत्याचार केला.त्यानंतर तो तेथून निघुन गेलेला दिसला.त्यानंतर निषाद यांनी मागील सात दिवसाचे सीसीटीवी फुटेज तपासले असता,20 जून रोजी मध्य रात्रि दिड च्या सुमारास विविध दोन व्यक्तिनि भोळसर महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले.त्यामुळे त्यांनि दिलेल्या फिर्यादिनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी तपास करुण आरोपिला अटक केली आहे.त्यांनंतर चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली.त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयात सहाय्यक सहकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तिवाद केला.आरोपिला पोलिस कोठडीची विनंती न्यायालयाकडे केली.