सतिश मवाळ
प्रतिनिधी
जिन्दगी काँटो का सफर है,
हौसला इसकी पहचान है,
रास्ते पर तो सभी चलते है,
जो रास्ता बनाए वही इन्सान है..
मनुष्य जन्म मिळाला तर आहे, मात्र चांगले जगणे खूप कठीण आहे. सध्याच्या काळात साध्या सरळ माणसाला जगताच येत नाही, रोज नव – नवीन समस्या, खूप त्रास आहे. परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही, आपण काही करूच शकत नाही. एकूणच घटना, घडामोडी, जबाबदा-या पाहता जगणे खूपच कठीण आहे. यापेक्षा मरणे सोपे आहे, एकवेळचं मेलो की सुटलो, असा आत्मघातकी विचार करण्याची संख्या कमी असली तरी ती वाढतेय, हा चिंतेचा विषय आहे. मात्र मरणे सोपे वाटणा-यांचे जगणे कसे सोपे व सुकर करता येईल, याचे धडे विंâवा अभ्यास शिकविला जात नाही.
अध्यात्म हे जीवन-मृत्यू काय आहे? हे सांगतं, जगण्याचं बळ देतं, सहनशक्ती वाढवतं, असे आढळून येत असले तरी खूप लोक अध्यात्माशी जुळत नाहीत, त्यामुळे आत्मघातकी मृत्यू रोखण्यात अध्यात्म पुरेसे ठरत नाही. परिणामी ताण तणाव नियंत्रण, आनंदी व उत्साही राहणा-या टिप्स, हॅपिनेसचे कार्यक्रम, सकारात्मक व्याख्याने, सकारात्मक जीवन जगण्याच्या पध्दती, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, इत्यादी बाबी केल्या जात आहेत. वास्तविक मनुष्याने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली मात्र मानवाची वाटचाल शेवटी उदासिनतेकडे होत आहे, असे खेदाने म्हणावे लागते. परिणामी ‘खुशनुमा जिंदगी’साठी काही बदल स्वत:मध्ये प्रयत्नपूर्वक करून घ्यावे लागतात. आणि त्याबाबत सातत्य ठेवावे लागते. अनेक व्याख्याते प्रामुख्याने बी. के. शिवानी, बी. के. उषादिदी, उज्वल पाटणी, उमेश कणकवलीकर, संदीप माहेश्वरी, सद्गुरू, श्रीश्री रविशंकर, अशी अनेक नावे घेता येतील की जे ‘जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा‘, असे सातत्याने सांगत आहेत. तसेच यापूर्वीही संत महात्मे आणि आचार्य रजनीश, जे. कृष्णमूर्ती अशा अनेक विचारवंतांनी सांगितले. मात्र ‘समजते पण उमजत नाही’, अशी मनुष्य स्वभावाची स्थिती असल्याने मानव व समाज अपेक्षेप्रमाणे सुधारत नाहीत.
काही दिवसांपूर्वी याच आशयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये पाच ‘C’ बाबत सांगून आयुष्यात समावेश करण्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रथम ‘C’ म्हणजे ‘क्रिटीसाईज’ अर्थात इतरांना कमी लेखणे, दोष देत राहणे, तो-ती असे – तसे म्हणून नावे ठेवणे टाळले पाहिजे, द्वितीय ‘C’ म्हणे ‘डोंट क्राय’ नेहमी रडत बसू नका, मी त्रासात आहे, असे नकारात्मक बोलत बसू नका, तिसरा ‘ण्’ म्हणजे ‘डोंट कंम्प्लेंट’ नेहमी तक्रारी करू नका आणि चवथा ‘C’ म्हणजे ‘डोंट कम्पेअर’, अर्थात इतरांशी नाहक तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. जगाताील ७५० कोटी लोकसंख्येत प्रत्येकाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे जसे वेगवेगळे आहेत, तसे. आणि शेवटचा पाचवा ‘C’ म्हणजे ‘कॉम्प्लीमेंट’ अर्थात नेहमी शुभेच्छा, शुभभावना देत रहा, दुस-यांचे चांगले पहा व म्हणा, प्रोत्साहन देत रहा, हे होय. मात्र हे सर्व अंगीकारणे तेव्हाच सोपे होते जेव्हा याबाबतचा दैनंदिन सराव केला जातो, या गोष्टी आपल्या सवयीत बसवाव्या लागतात. त्यासाठी इच्छाशक्ती दृढ असायला हवी, तसेही होऊ शकत नाही असे काही नसतेच, फक्त ते करण्यासाठी लागणारे ज्ञान, परिश्रम व सातत्य, असायला हवे.
एकूणच आपल्या आयुष्यात दुसरे कोणी येईल व काही करेल आणि त्यामुळेच आपले जगणे सुकर होईल, या आशावादावर अवलंबून न राहता स्वत:च अनुभवाने आपले जगणे सुकर केले पाहिजे. सकारात्मक, आनंदी, व उत्साहीत राहून आपले ‘रेकॉर्ड’ आपणच तोडले पाहिजे. प्रत्यक्षात आपण सर्वांसाठी उपयोगी (युजफूल) ठरलो पाहिजेत, तेव्हा ख-या अर्थाने आपल्याला जगता आले, असे म्हणता येईल. कोणता देश प्रगत आहे हे पाहण्यासाठी आनंदी (हॅपीनेस इंडेक्स) पाहिल्या जाते. समाजात ९०% लोक न्यूट्रल असतात. मी आणि माझे एव्हढेच ते पाहतात. तर ५% सकारात्मक व ५% नकारात्मक असतात. नकारात्मक लोक सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांचा जास्त संपर्क असतो, तेव्हा त्यांनी बदलून सकारात्मक झाले पाहिजे, म्हणजे देश आनंदी होईल.
शेवटी चांगले जीवन जगण्याचे आपले स्वप्न साकारण्यासाठी योग्य मार्गाने सतत प्रयत्नरत रहावे, या आशयाचा शेर आठवतो…
मुश्किल नही है कुछ दुनियाँ में,
तू जरा हिम्मत तो कर,
ख्वाब बदलेंगे हकीकत में,
तू जरा कोशिश तो कर…
. . – – राजेश राजोरे