दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद, दि.21 तालुका क्रीडा संकुल, आमखास मैदानावर जागतिक योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरात सफाई अभियान राबविण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, साजिद पटेल, अजहर पठाण, जावेद पठाण, नईम खान, शेख मुख्तार, सतीश वानखेडे आदी उपस्थित होते.