वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ :- राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील दोन नागरिक क्लुंझर एम. एच. 29 ए. आर. 1063 या फोर व्हीलर मध्ये दारू नेत असल्याचे स्वंशयावरूण वडकी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांनी सापळा रचुन देशी दारू 4 बाॅक्स व दोन मोबाईल , फोर व्हीलर गाडी सह 5,19,984 मुदेमालसहीत रात्री सापळा रचुन पकडण्यात आली. आरोपी अतुल प्रभाकर येरकाडे, मारोती जनार्दन घुघरे, रा विहीरगाव यांना पकडण्यात आले..
हि कारवाई वडकी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विलास जाधव, रूपेश जाधव, शंकर जुमनाके या सर्वानी मिळुन पार पाडली या कारवाई मुळे वडकी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या गावातील दारू विक्रेत्यांना धडकी भरली आहे हे मात्र नक्की..


