कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार: तळोदा-मोती बँक आणि नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या २५ वर्षाच्या अखंड सेवा कार्याचा रजतोत्सव साजरा करण्यासाठी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या विशेष प्रसंगी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या नृत्य अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात पालक, विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था चालकांकडून करण्यात आले आहे. बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील या ऐतिहासिक टप्प्याचे महत्व लक्षात घेता, संस्था आणि संस्थेतील प्रमुख सदस्य यांच्यातील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. मा. श्री. विजयकुमारजी गावीत, आमदार, नंदुरबार, मा. श्री. राजेशदादा पाडवी, आमदार शहादा-तळोदा, आणि मा. हिनाताई गावीत, माजी खासदार, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव मकरंद पाटील, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने हा समारंभ आणखीसाजरा होणार आहे. समारंभाच्या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरणारी नृत्य अविष्कार सादरीकरणे असतील, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव मिळणार आहे. त्यात शंभर विद्यार्थिनी सादर करणार वंदे मातरम् गीत, जय • जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत तसेच, अफजलखान वध, राजस्थानी घुमर नृत्य व इ कलाविष्कार सादर होणार आहे शालेय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी एक महत्वपूर्ण अनुभव ठरणार आहे.
समारंभाचे आयोजन ७ डिसेंबर २०२४, सायंकाळी ५ वाजता भारत मिल कंपाउंड, तळोदा येथे करण्यात आले आहे. बँक आणि शैक्षणिक समूहाने केलेल्या या महत्त्वपूर्ण पाऊलाला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष निखिलकुमार
तुरखिया, दगेसिंग महाले, संजय पटेल, सौ. सोना तुरखिया, हर्षिल तुरखिया यांनी केले आहे.