दत्तात्रय नेटके
तालुका प्रतिनिधी आंबेगाव
महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे बुधवार दिनांक 4/12/2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी व शैनेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंदिरा चे भूमिपूजन समस्त ग्रामस्थ बलुतेदार मंडळी त्यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पांडुरंग दिवेकर, मारुती दिवेकर, रामदास राऊत, काशिनाथ शिंदे सर, सुरेश शिशुपाल, दत्तात्रय गाडेकर हे पूजेसाठी बसले. याप्रसंगी उपस्थित माजी सरपंच हनुमंत शिंदे, पत्रकार दत्ताभाऊ नेटके, बाळासाहेब दिवेकर, राजेश दहीतुले, अलंकार भालेराव, दशरथ दिवेकर, मधुकर थोरात, सिद्धेश देशमुख, भरत दिवेकर, किरण दहिवाळ, भास्कर राऊत, सुरेश राऊत, श्री दत्त पतसंस्था व्हाईस चेअरमन जयश्री दहीतुले इत्यादी उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी व शनेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश दहीतुले पाटील यांनी मंदिराच्या जिर्णोद्धार कामी श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या आमदार फंडातून वीस लाख रुपये मंदिरासाठी मिळाले असून लवकरच मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरू होईल या कामासाठी भीमाशंकर साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब बेंडेपाटील यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच गावचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश आवटे काका हेमंत रमेश संत उपस्थित होते. या मंदिर कामासाठी नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून वळसे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागल्याने समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळ व बलुतेदार संघटना म्हाळुंगे पडवळ यांनी वळसे पाटील यांचे आभार मानले.