महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील श्री. साई काॅन्व्हेंटच्या वतीने येथील श्री.साई लाॅन येथे आयोजित ‘खरी कमाई’ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्वताचा व्यवसाय उभारुन आणि मेहनत करून नफा कसा मिळवायचा व आपली उपजीविका कशी करायची याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन विविध शाळांमध्ये केले जाते. याच हेतूने येथील श्री.साई काॅन्व्हेंटच्या वतीने ‘खरी कमाई ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे हो त्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख श्री.विदये सर, संस्था अध्यक्षा श्रीमती कांता गुंडावार,प्रा.अतुल गुंडावार, मुख्याध्यापक अतुल बडकेलवार,रुपा गुंडावार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन तथा रीबन कापून आनंद मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले.अशा या फुड फंक्शन च्या आयोजना मुळे खरी कमाई कशी करायची याचे ज्ञान मुलांना मिळतात असे उद्घाटन प्रसंगी विदये सर यांनी सांगितले. त्या नंतर वर्ग 5 ते 10 च्या मुला मुलींनी लावलेल्या फुड फंक्शन स्टॉलचे पाहनी केली.या वेळी विद्यार्थ्यांनी घरून तयार करून आणलेली पाव भाजी, गुपचूप,मुमुज, पेस्टी,भेल, चहा, कॉफी,नुडल्स, मंचुरी यम , आदी पदार्थांचे लावलेल्या स्टॉल वर विद्यार्थ्यांसह पालकांनी उदंडप्रतीसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहेबा सिदकी हिने केले तर आभार प्रदर्शन देवानंद जुमडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बदखल, रूपाली नंदनवार प्रियाडोर्लीकर , श्रध्दा कोमटी,सपना क्षिरसागर, सुप्रोत्तम मिस्त्री सुनील दैदावार, सुजाता ढोके,खुशाली नारायणे,पुजा येन्नावार ,सुषमा उरकुडे, स्नेहल ढेंगरे ,हर्षिता मॅडम यांनी सहकार्य केले.