महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तब्बल दोन वर्षाच्या कोरोना लाकडाउन नंतर होळी व धुलीवंदनाच्या रंगाने जून्या आठवणींना नव्याने उजाळा देत येथील शिवनगर वार्ड येथे होळी व रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेथील पुरुषांनी व महिलांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात धुलीवंद उत्सव साजरा केला. लाकडाऊनच्या बऱ्याच मोठ्या काळानंतर ही संधी पुरुष व महिला तथा नवयुवकांना मिळाली. त्यामुळे नवयुकांनी आनंद घेण्यात कसलीही कसर सोडली नाही.आणि मोठ्या उत्साहात रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवनगर येथील प्राची गूडावार,जिजा डोये,अम्रिता कंचलावार,एकता निमसटकर,शूभांगी देठे,मत्ते,महेश निमसटकर,वनितातनंगूलवार,कोमरेडिवार व महिला व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.