किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
चाकण : येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या विदर्भातील गरीब दिपक जाधव दाम्पत्याच्या पाच वर्षीय लहान मुला सोबत झालेल्या दुचाकीच्या अपघातात उजव्या पायाच्या हाडाला जबर मार लागल्याने त्या पायाच्या हाडाचे दोन तुकडे झाले होते. दिपक जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन रोडच्या कडेला असलेल्या टिनाच्या पत्राशेडमध्ये राहत होते.दिपक जाधव व त्यांची पत्नी हे दोघेही शेजारी एका बिल्डरकडे मजुरीने कामाला गेले होते.त्यांची मुलगी वय ३ वर्ष व मुलगा वय ५ वर्ष ते रहात असलेल्या ठिकाणी रस्त्यावर खेळत असतांना भरघाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने त्या लहानग्या मुलाच्या पायाला जोरदार धडक मारली व पोबारा केला.तेथे आजू बाजूच्या राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा करत त्या मुलाच्या आई वडिलांना तेथे बोलावून त्यांना घडलेली हकीकत सांगितली.आई वडीलांना काय करावे सुचत नव्हतं अशावेळी त्यांना त्यांची ओळख असलेले संदिप चव्हाण आठवले व त्यांना मदतीसाठी बोलावले.सदिप चव्हाण काही वेळातच त्याठिकाणी पोहचले व त्यांनी त्यांचे वासुली गावचे युवा उद्योजक संकेत घनवट या मित्राला सोबत घेऊन त्यांच्या गाडीत टाकून जवळच असलेल्या तळेगाव येथील अथर्व हाॅस्पिटलला अडमिट केले व ताबडतोब उपचार सुरू केले. दिपक जाधव यांच्या कुटूंबाची परिस्थिती खुप बिकट होती रोज कमविणे व खाने अशी परिस्थिती,तो मुलगा आठ दिवस अडमिट असतांना संदिप चव्हाण यांनी रोज पन्नास किलोमीटर जाणे व येणे करून त्यांना दोन्ही वेळ जेवणाचा डबा व औषधींची मदत करून बिल्डर ला सांगून आर्थिक मदत उपलब्ध करून त्या परिवाराची हाॅस्पिटलचे बिल भरण्यासाठी प्रामाणीक मदत केली.यासाठी पातुर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी संदीप चव्हाण मुळ गाव आसोला पातुर व संकेत घनवट वासोली पुणे यांचे विशेष कौतुक करून त्यांचा सन्मान केला. ही घटना १४ मार्चला दुपारी बारा वाजता घडली.दिपक जाधव व त्यांची पत्नी जयश्री जाधव मुलगा पृथ्वीराज जाधव याचे मुळ गाव भोयनी,ता.मानोरा,जि. वाशिम हे आहे.


