विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : अकोला पंचायत समिती मधे पं. स. सभापती राजेश वावकार यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६ मार्च २०२२ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अकोला पंचायत समितीच्या नियोजन सभागृहाला क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव देण्यात यावे या विषयासह विवीध व इतिहासात नोंद होणाऱ्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
शिव, फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र हा संपूर्ण देशात आपल्या कर्तृत्वाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अकोला पंचायत समिती सुध्दा ह्या चारही महापुरुषांच्या विचाराने चालत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावी म्हणून अगोदरच अकोला पंचायत समितीच्या एका प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव तर दुसऱ्या प्रवेश व्दाराला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे व आता अकोला पंचायत समिती नियोजन सभागृहाला महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव देण्यात आले सोबतच पंचायत समितीच्या तळमजल्यावर असलेल्या हॉलला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे आता अकोला पंचायत समिती नियोजन सभागृहाला ह्यानंतर महात्मा ज्योतीबा फुले नियोजन सभागृह पंचायत समिती अकोला असे संबोधले जाणार आहे त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांना कुठलीही बसण्याची किंवा शासकीय काम करण्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करण्यासाठी सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांची सतत मागणी होती कि अशी व्यवस्था पंचायत समितीमधे उपलब्ध करून देण्यात यावी. ही मागणी आज विषय सुचीवर घेवून या सर्वांना बसण्यासाठी व इतर प्रशासकीय कामकाजासाठी “सरपंच तथा अभ्यागत कक्ष” म्हणून मंजूर करण्यात आला. तसेच अनेक विकासकामांचे व योजनांचे विषय आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहुमतात मंजूर करण्यात आले. ह्या सर्वसाधारण सभेमध्ये सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंद डोंगरे, वंचित बहुजन आघाडीच्या पं. स. गटनेत्या सौ. मंगलाताई शिरसाट, पं. स. सदस्य किसनसिंग सोळंके, अजय शेगावकार, सचिन थोरात, सौ. आशाताई निशानराव, सौ. छायाताई वानखडे, सौ. शोभाताई नागे, सौ. आशाताई इंगळे, लखुआप्पा लंगोटे, भरत भोरे, गजानन वानखडे, सौ. सुलभाताई सोळंके, सौ. शुभांगीताई भटकर सहा. गटविकास अधिकारी श्री रूद्रकार यांच्यासह विस्तार अधिकारी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
*आपले उर्जास्त्रौत असणारे शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या समता आणि समानतेचा संदेश तथा त्याग हा सर्व तळागाळातील माणसांपर्यंत पोचावा आणि आपल्या आदर्शांचं नियमित स्मरण व्हावं याच उद्देशाने नामाभीधानाची कल्पना सुचली आणि आज सर्वानी एकमताने एकदिलाने सदर ठरावास मंजुरी सुध्दा दिली.
,, राजेश वाहोकार
सभापती अकोला.