किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
नर्स रूग्णसेवेतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करता… ना.रामदास आठवले केंद्रीय मंत्री भारत सरकार
पुणे : जिल्ह्यातील इंदापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचलित जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूरच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे दिमाखदार आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत खुप उत्साहाने सहभागी होवून गायन,नृत्य,फॅशन शो तसेच ग्रामीण भागातील विविध राज्यांतील लोककलेचं अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांची अक्षरशः मने जिंकली.
संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजु मुला मुलींना कमवा व शिका योजनेतून नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण देण्यात येते.येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी हे विदर्भातील ग्रामीण भागातील अतिशय गरीब कुटुंबातील आहेत त्यामुळे ही संस्था विदर्भातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची जीवन वाहिनी ठरली असून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे जीवन मान उंचावले आहे.येथील संस्था चालक व शिक्षक वृंद येथील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपतात व कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्या पुढे येवू देत नाही. कोरोना काळात या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अतोनात कष्ट करून अनेकांना जीवदान दिले आहे. अशा संस्थेच्या शंभर बेडच्या सुसज्ज अशा हाॅस्पिटलच्या इमारतीचे भूमीपूजन व वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद् घाटन भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते पार पडले. जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूरचे नाव संपुर्ण देशात त्यांच्या उल्लेखनीय कार्याच्या माध्यमातून गगनाला भिडले आहे.प्रत्येक घटकातील दिन दुबळ्या गरीब कुटुंबातील नैराश्याच्या जीवनात जगणा-या मुलींना कमवा व शिका योजनेतून उभारी देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मला नेहमी सहकार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष जयवंत नायकुडे यांचे योगदान खुप मोठे आहे असे गौरवोद्गार यावेळी भारत सरकारचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी काढले. राज्य रूग्णसेवक संघटनेचे व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रविण भोटकर यांनी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनींना रूग्णसेवा ही ईश्वर सेवा करण्या पलीकडची सेवा आहे ती निष्ठेने करावी असा संदेश देत समाजाच्या सेवेसाठी काम करणारी ही संस्था व या संस्थेला मिळालेला ध्येयवादी माणूस जयवंत नायकुडे सरांची वंचितांना रोजगाराभिमुख बनवायची योजना खुप प्रेरणादायी आहे असे त्यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ख-या अर्थाने उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील रूग्णसेवकांना याप्रसंगी भारताचे सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये विदर्भातील आपल्या कामातून कोहीनूर हि-या प्रमाणे चमकणारे महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटना व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रविण भोटकर ( समाजरत्न ),संतोष लबडे ( विदर्भरत्न ),ठाकूर शिवकुमारसिंह बायस ( समाजगौरव ),विजय वानखडे ( समाज भूषण ),मंगेश केनेकर ( समाज भूषण ),रक्षण देशमुख ( समाज गौरव ), सोमनाथ बोबडे ( समाज भूषण ) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. पातुर तालुका विकास मंचचे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी बोलताना सांगितले की जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याच्या जोरावर अत्यल्प काळात उभारी घेणारी अग्रगण्य संस्था आहे, ग्रामीण भागातील तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांना कमवा व शिका या योजनेतून स्वतःच्या पायावर उभे करून रोजगार मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते ही खुप महत्वपूर्ण बाब आहे.त्यांनी दिलेल्या पुरस्काराने तालुक्यात समाजसेवा करण्यासाठी अनेक तरूण यानिमित्ताने पुढे येतील व समाजाच्या विविध समस्यांवर एकजुटीने काम करतील अशी आशा आहे.भविष्यात नेहमी असेच समाजकार्य सुरू राहील असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत नायकुडे यांनी प्रास्ताविक करून संस्थे मार्फत चालवल्या जाणा-या विविध योजनांची माहिती दिली.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,सोलापूर जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे,अशोक इंगळे,स्वप्निल रेवाळे,अमोल लवंगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.










