महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. 16 : दर वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना माईंड गॅलेक्झी बहुउद्देशिय सस्थेकडुन पुरस्कार दिले जातात .या वर्षी संस्थेकडुन संपूर्ण देशातून विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यासाठी संस्थेकडुन देशभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.असे संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डाॅ जगदीश राठोड यांनी सांगितले आहे या पुरस्कारासाठी अतिदुर्गम भागातिल मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं1 या बंजारा गावातील अशोक दिगांबर जाधव यांना जगतगुरू संत सेवालाल महाराज राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे हे सर्व पुरस्कार मुंबई येथे देण्यात आले आहेत.