सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : जिल्हा त्रैवार्षिक निवडणूक कृषी सहाय्यक पतसंस्था लातूर या ठिकाणी पार पडली, निवडीसाठी या ठिकाणी जिल्हाभरातून कृषी सहाय्यक व त्यांचे प्रतिनिधी आले असता सर्वानुमते ओम माने यांची अध्यक्षपदी तर एस के तिवारी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांचे राज्य प्रतिनिधी म्हणून एस के कसबे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सचिव पदी शरद धनेगावे आणि कार्याध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड करण्यात आली तसेच यावेळी कृषी सहाय्यक संघटनेचे लातूर जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री पाटील व श्री राठोड यांनी काम पाहिले सदर निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या निवडी बद्दल कृषी सहाकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जिल्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निवडीचे स्वागत केले.