विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील पातुर नंदापूर निरगुडा नदीच्या पात्रामध्ये दि. 12 मार्च रोजी गावठी हात भट्टी सुरू असल्याच्या माहितीवरून केलेल्या कारवाईत चार जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीत दोन लाखाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने पातुर नंदापूर निरगुडा नदीपात्रामध्ये गावठी हातभट्टी काढण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारी कारवाई आरोपी बाळकृष्ण उत्तम खंडारे, बबन अंबादास वाकपांजर, प्रितम राजेंद्र चक्रनारायण, व भगवान उत्तम भगत,
हे चारही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नदीपात्रामध्ये गावरान दारू काढण्याचे भट्ट्या लावून दारु काढत होते.
या वेळी कारवाई करून मोह फुलाची दारू 200 मिटर, मोह चा सळावा 500 लिटर, हात भट्टी साठी लागणारे साहित्य 60 हजार रुपये, 200 नग देशी दारू कॉटर,
मोहरा होण्यासाठी लागणारे डब्बे 70 नग 20 लिटरने भरलेले,
असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने केली आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत गाव शिवारात कारवाया करण्यात आल्या परंतु
अवैद्य धंदेवाल्यांना चाफ मिळत नसल्यामुळे त्यांच्या मुजोर्या वाढले आहेत. या कारवाईमुळे पिंजर पोलीस स्टेशन वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










