विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : पातुर नंदापूर येथे स्व. डॉ. आनंत गवळी यांच्या जन्मदिनानिमित्त 13 मार्च रविवार उमामहेश्वर संस्थान पातुर नंदापुर येथे आयोजित केले होते.
भव्य रुग्ण तपासणीसाठी नामांकित डॉक्टर यांच्याकडून तपासणी व वैद्यकीय सल्ला ग्रामीण क्षेत्रातील महिला पुरुष यांना मिळावा व आपल्या आजारपणाची काळजी घ्यावी कारण शहरापर्यंत तपासणीसाठी जात नसल्यामुळे पातुर नंदापूर या गावी भव्य रुग्ण तपासणी व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अकोला येथील नामांकित तज्ञ डॉक्टर या तपासणीसाठी आल्यामुळे गावातील असंख्य महिला पुरुषांनी आपल्या तपास न्या करून घेतल्या अकोला येथील नामांकित डॉक्टर हृदय रोग तज्ञ आशिष मापारी, जनरल सर्जन संतोष इंगळे, बाल रोग तज्ञ विशाल काळे, मूत्रपिंड व किडनी तज्ञ अमर सुलतान, जनरल फिजिशियन सागर थोटे, मित्र तज्ञ वा फिजिशियन अनुप गवळी, चर्म रोग तज्ञ सागर ताले, स्त्री रोग तज्ञ आशिष ताले व दिपाली सुलतान, गौरी मापारी, दंतरोग तज्ञ गौरव शिंदे, सोमिल खडसे, प्रणाली गवळी गवळी. अस्थिरोग तज्ञ प्रणय महल्ले ,या सर्व नामांकित डॉक्टरांचा पातुर नंदापूर मध्ये गावकऱ्यांसाठी मोफत तपासणी चे आयोजन केले होतं सकाळी १०ते दुपारी १२ या वेळेस आपली तपासणी गावकऱ्यांनी करून घेतल्या व योग्य संधीचा लाभ घेण्यात आला. आयोजकांनी सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रम यशस्वी झाला.