महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१०:-महिलेचा विनयभंग करुन अश्लिल शब्दात शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना येथील न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवसांचा कारावास अशी शिक्षा नुकतीच सुनावली. तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशन अंतर्गत सन २०१२ मध्ये नंदकिशोर मांढरे, दशरथ मांढरे व लक्ष्मण पचारे यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग करून अश्लील शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी पिडीत महिलेने माजरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अप. क्र.४१/१२ भा.दं.वि. कलम ३५४,५०९,५०४,५०६, ३२३,३४ अन्वये गुन्हा दाखल करुन तीनही आरोपींना अटक केली होती.
या घटनेचा सखोल तपास करुन पोलिसांनी भद्रावती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला असून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना वरील शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून खंडाळकर यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बाबुराव कुसळे यांनी केला. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार राजकुमार उरकुडे यांनी काम पाहिले.










