नऊ महिलाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. 9:’ शिवसेना महिला आघाडी भद्रावती तर्फे मा .शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख महिला आघाडी यांचे आदेशानुसार जागतिक महिला दिन भद्रावती येथे साजरा करण्यात आला . मा .मायाताई नारळे उप जिल्हाप्रमख महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा यांचे पुढाकारतून शहरातील नऊ महिलांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . साकारमूर्ती डॉ दिपाली मोहितकर छायाताई ढपकस, श्रीमती कल्पना येरमे मंगला घाटे सविता ढुमे पुष्पा सेंदरे मुन्नी बाई फुलमोगरे स्वाती दहीवलकर संगिता नागपूरे यासर्व अंगणवाडी सेविका तसेच सफाई कर्मचारी आरोग्य सेविका यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला अश्या प्रकारे जागतिक महिला दिन शिवसेना महीला आघाडीतर्फे साजरा करण्यात आला यावेळी सौ मायाताई नारळे उपजिल्हा प्रमख महीला आघाडी सौ . कल्पनाताई भुसारी तालुका प्रमुख महीला आघाडी शिलाताई आगलावे उपशहरप्रमुख मिनलताई आत्राम नगरसेविका अल्काताई वाटेकर शोभा कंदिकूरवार रजनी डंभारे चामाटे मॅडम पुष्पा लांडगे संगिता लोहकरे अश्विनी गुरुनूने चंदा गोंडे आशा लोहकरे चटपल्लीवार ताई गिता पतरंगे सुरेखा चाफले प्रिया पोईनकर व शहरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.मार्गदर्शन प्रा. शोभा कंदिकूलवार यांनी केले