विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जन महागाव लोहगाव येथील अनिल ज्योतीराम चव्हाण वय वर्ष ४०
या इसमाची शेतात जागल ला गेला असतानी त्याची हत्या झाली.
अशी तक्रार मृतक अनिल चे वडील ज्योतीराम भिमसिंग चव्हाण वय ६५ रा. लोहगाव महागाव.
यांनी पिंजर पोलीस स्टेशनला दिली.
परंतु पिंजर पोलिसांच्या लक्षात येताच. शोध कार्य सुरू करण्यात आले.
आणि या हस्ते मागचे गुड काय शोधण्यास सुरुवात केली.
मृतक अनिल हा दिवसभर आपले काम उरकून स्वतःच्या ट्रॅक्टरने हरभरा काढून झाल्यानंतर दि३ मार्च ला
रात्री ९ च्या सुमारास परा भवानी शिवारामध्ये असलेल्या शेतात
हरभऱ्याची राखणी करण्यासाठी गेला होता. अनिल हा सकाळी घरी का आला नाही म्हणून त्याचे वडील ज्योतीराम व त्यांचा नातू दोघे बरोबर मोटर सायकल घेऊन त्याला उठवण्यास गेले.
शेतात जाऊन पाहतो तर काय अनिलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अशी तक्रार सुद्धा मृतक अनिल चे वडील ज्योतीराम यांनी दि.४ मार्च रोजी पोलीस स्टेशनला दिली.
या हा त्याच्या मागचे गुड काय याचा शोध पोलीस ने सुरु केला.
विचारपूस केली असता पोलिसांनी लगेच मृतकाच्या वडिला चा सांगण्यावरून संशय व्यक्त केला. आणि त्यांना वाचा फोडण्यात आली. अनिल ची
हत्या त्याच्याच पित्यानेच केल्याचे
निदर्शनात आले पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम, पीएसआय करुणा माहुरे, बीड इन्चार्ज राजू वानखडे, गोपाल आकोटकर, अभिजीत शिरसाट,
संतोष वाघमारे, रोशन पवार, ज्ञानेश्वर राठोड, चंद्रशेखर गोरे, संतोष हिरळकर, ए ल सी बी जाधव, बोरकर, या सर्व पोलिस पथकाने ८ तासामध्ये आरोपीला शोधण्याचे काम केले आहे.
अनिल ची हत्या त्याच्या जन्मदात्या ने केली असा चौकशी दरम्यान समजण्यात आले.
मृतक अनिल याचासुद्धा संपूर्ण कुटुंबाला त्रास होता. असे त्याच्या पित्याकडून सांगण्यात आले आहे
या घटनेची संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली होती.
परंतु पिंजर पोलीस स्टेशनच्या चमूने अवघ्या ८ तासांमध्ये शोध घेण्याचे कार्य केले आहे. आरोपी ज्योतीराम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशन ठाणेदार अजयकुमार वाढवे हे करीत आहेत.


