अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : मेडशी गाव सुख समृध्दीयुक्त गाव म्हनून पंचक्रोशित प्रसिद्ध आहे.येथे मोर्णा प्रकल्प अंतर्गत खुप मोठं धरण असून बऱ्याच शेतकरी वर्गाकडे ओलिताची बाराही महिने पीक काढता येईल अशी शेती आहे.मात्र बहुतांश शेतकरी हे परंपरागत पद्धतीने शेती करतात.त्याचा विचार करून मेडशी येथिल गजानन तायडे जे की डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे यांच्या माध्यमातून शेतकरयांना आधुनिक तंत्रज्ञानाचा माहिती देण्याच्या उद्देशाने गावातील शेतकरी बंधूंना घेउन वनविद्या महाविद्यालय व डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आयोजित एक दिवसीय प्रशिक्षन देण्याचा मानस ठेवत कारंजा तालु्यातील मनभा येथे नेले व तिथे गावातील प्रगतशील शेतकरी निळकंठराव देशमुख यांच्या नेचर्स ब्लीझ शेतीला भेट दिली सदर कार्यक्रम मध्ये श्री राहुल देशमुख यांनी कृषि पर्यटन व एकात्मिक पद्धती यावर मार्गदर्शन केले तर
श्री निळकंठराव देशमुख यांनी शाश्वत भाजीपाला उत्पादन व नियोजन यावर मार्गदर्शन केले तर श्री दत्तात्रय टाले यांनी मधूमक्षिका पालन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तर
श्री पवन मिश्रा यांनी जैविकशेती व श्री निलेश हेडा यांनी मत्स्यपालन या विषयावर मा्गदर्शन केले.तर विद्यापीठाच्या वतीने प्रा सुधाकर चौधरी यांनी वनशेती वर मार्गदर्शन केले तर
प्रा हर्षवर्धन देशमख यांनी कृषि वनशेती व जैविक कुंपण यावर मार्गदर्शन केले.तर श्री श्याम सवाई यांनी खपली गहू या विषयावर मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांकडून मेडशी मधील प्रगतशील शेतकरी अजिंक्य मेडशिकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन प्रा हर्षवर्धन देशमुख यांनी केले.या कार्यक्रमाला वन विद्या महाविद्यालयाचे श्री अनंत देशमुख,श्री गजानन तायडे, पृथ्वीराज चव्हाण व शाहबाझ हे यांच्यासह मेडशी व माळराजुरा येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.