अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मेडशी प्रभाग मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माझी पोषण परसबाग व माझी उपजीविका मोहीम राबविली जात आहे. याच पार्शवभूमीवर मेडशी येथे आज पर्यंत तीस पेक्षा जास्त परसबाग निर्माण केल्या गेल्या आहे.दररोज आपल्या परिवाराला खाण्यासाठी जो भाजीपाला लागतो तो बाजारातून विकत घेऊन खावा लागतो व तो पण विषयुक्त असतो. कारण त्यावर कीटकनाशक फवारणी तननाशक चा उपयोग केला गेलेला असतो. त्यामुळं तसा भाजीपाला खाल्याने शरीराला हानी पोहचते. खूप प्रकारच्या गंभीर आजारला मानवी शरीर दिवसे दिवस बळी पडत आहे.याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने परसबाग निर्मिती वर भर देत विषमुक्त सेंद्रिय शेती करण्यासाठी विशेष भर दिला आहे.याला मेडशी मधील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून परसबागेची निर्मिती केली आहे.आणि स्वतःच्या घरच्या पुरता विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला,डाळ ते आपल्या परसबागेतून उत्पादन घेऊन आपली दैनदीन गरज भागवत आहे.त्यामूळे त्यांचे खर्च पण कमी झाला आरोग्य पण निरोगी राहत आहे.या कार्यक्रमाला विशेष उपस्थती म्हणून वाशिम जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक मा सुधीर खुजे साहेब,तालुका अभियान व्यवस्थापक अखिल शेख, प्रभाग समन्वयक गायकवाड साहेब व उगले साहेब तसेच करडा कृषी विज्ञान केंद्र येथून शास्त्रज्ञ काळे साहेब व कृषि सहायक शुभांगी वाटाणे ह्या सुद्धा उपस्थीत होत्या.तसेच प्रभाग संघाच्या अध्यक्षा मनीषा घुगे व सचिव छाया थोरात हया पण होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सौ आशाताई तायडे, प्रियाताई पाठक , लता जाधव, याणी केले होते. कृषी सखी, बँक सखी, पशू सखी यांच्या सह सकाळ चे प्रतिनिधी अजय चोठमल व जय भगवान जैविक गटाचे अध्यक्ष अजिंक्य मेडशीकर ह्यांची सुद्धा उपस्थीती होती.