वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
सर्व कोतवाल यांच्या तळागळातुन समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ येथे झालेल्या कोतवाल संघटनेच्या आमसभेत झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या कोतवाल संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी सौ छाया गणेश दरोडे यांची बिनविरोध निवड झाली असुन सदर निवड ही सोळा तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांच्या सहमतीने झाली आहे .
आपण सर्वांनी माझ्या प्रती जो विश्वास दाखवीला त्याला निश्चितच मी स्वार्थ करुन दाखवेल महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने साठी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने नेहमी सहकार्य करील जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने सर्व कोतवाल बांधवांना न्याय देण्याचा व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करील असा विश्वास कोतवाल संघटने च्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ छाया गणेश दरोडे यांनी मांडला.


